Do share to your contacts. This is to aware people about the thoughts of Dr. Ambedkar. It's our fundamental duty to develop scientific temper in ourselves as well as others.
[1 जानेवारी 1993 रोजी प्रबुद्ध भारत मध्ये प्रकाशित झालेला हा लेख आहे. संदर्भ: पुस्तक - अर्जुन डांगळे यांचे "दलित विद्रोह". .सुधारणेचे स्वागत आहे. हा लेख माझ्या ब्लॉगवर इंग्रजीमध्ये देखील प्रकाशित झाला आहे. या लेखामध्ये कोणत्याही धर्म, जाती, धर्म यांच्यातील द्वेषभावना वाढविण्याचा हेतू नाही. ] 6 डिसेंबर 1992 हा भारतीयांच्या जीवनात उगवलेला दिवस विसंगतीने भरलेला होता. कारण सहा डिसेंबर म्हणजे, ज्यांनी या देशात समतेची सामाजिक न्यायाची लढाई दिली; धर्माच्या नावावर उच्चवर्णीयांच्या शोषण परंपरेवर भीषण प्रहार केले; त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा तो छत्तिसावा महापरिनिर्वाण दिन. त्याच दिवशी धर्मांधतेने झपाटलेले , धर्मनिरपेक्ष कृत्य पायदळी तुडवून धर्मपिसाट जमावाने हिंदुत्वाचा आणि श्रीरामाचा जयजयकार करीत अयोध्येची बाबरी मशीद जमीनदोस्त केली आणि देश भर हिंसाचाराचा आगडोंब उसळला. अयोध्या मध्ये जे घडले त्याचा निषेध होणे आवश्यक आहे. नव्हे कृतिशील प्रतिकाराच...
Comments
Post a Comment