सैराट आल्यानंतर आपल्या सगळ्यांना वाटलं कि आरची आणि परश्या सोबत जे झालं ते खूप चुकीचं होतं. पण थेटर मधून बाहेर पडल्यानंतर जात आणि धर्म पुन्हा आपल्या मनावर आरूढ झालेत . आजही भारतात सारख्या जातीत आणि धर्मात लग्न लावून देण्याचं प्रमाण खूप आहे. आपला हट्ट असतो तो. दुसऱ्या जातीत किंवा धर्मात लग्नं केलं तर समाजातून बहिष्कृत केलं जातं अनेकांना . संविधानाच्या पहिल्या पानावर भारतीय समाज कसा असायला हवा याचा संदर्भ दिलेला आहे. त्याला आपण प्रास्ताविक म्हणतो. मग त्यात अनेक गोष्टी दिल्या आहेत . त्यात न्याय , स्वातंत्र्य , समता आणि बंधुता या ४ गोष्टी प्रवर्धित करण्याचा संकल्प करतोय असा म्हटलंय. ७० वर्ष उलटून गेलीत . पण भारतीय समाज आजही जातीयवादाच्या विळख्यातून बाहेर पडलेला नाही. धार्मिक आणि जातीय ध्रुवीकरण प्रचंड प्रमाणात वाढलंय. आज आपण आपला नेता जात आणि धर्म पाहून निवडतो. आपण अशा टोकावर येऊन पोहोचलोय जिथे नेत्याला विरोध करणं म्हणजे धर्माला विरोध करणं,आणि धर्माला विरोध करणं म्हणजेच देशाला विरोध करणं झालंय. धार्मिक आणि जातीयवादी कत्तली आपल्याला रोजच्या...
Struggling Faces is a non-partisan page dedicated to provide relevant and contemporary content to the audience. We write on various issues ranging from national politics to geopolitics.